धारातीर्थ गडकोट मोहीम २०१८ – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

गतजन्म होता पावन । लाभले गुरुचे चरण ।।

भगवामय अंत:करण । गुरुजी केवळ तुम्हाकारण ।।

                                        – गणेश पावले

—————————^^^^^—————————-

#मोहीम म्हणजे सुखाचा सागर..

 मोहीम म्हणजे भारतमातेच्या उपासनेचा जागर…

मोहीम म्हणजे एका राष्ट्रऋषी योगी संताने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आई भवानीचा केलेला गजर..

मोहीम म्हणजे असंख्य पावलांनी गतकाळातील पावलांना घातलेलं आलिंगन….

मोहीम म्हणजे #हिंदवी #स्वराज्य उभं करताना ज्या शूर वीरांचे सह्याद्रीच्या मातीत रक्त सांडले त्या मातीला अंगाखांद्यावर कपाळी मिरवण्याचं सौभाग्य….

#धारकरी मत्रहो..

          मोहीम म्हणजे काय? हे जर सांगायला लागलो तर अनंत उपमा, लक्ष लक्ष शब्दपंक्ती अपुऱ्या पडतील. मोहीम लिहिण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा अनुभवन्यात जे काही #स्वर्गसुख आहे ते अवर्णनीयच!

           गुरुजींच्या पदस्पर्शाच सौभाग्य मोहिमेत लाभणे म्हणजे मोक्षप्राप्तीच.. विठुरायाचे चरण कुरवाळण्यात जितके सुख, तितकेच गुरुमाऊलीच्या चरणी लीन होण्यात सुख. मोहीम समारोपाच्या वेळी अनुभवलेले गुरुजींचे विराट रूप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माता यशोधेला श्री कृष्णाने दाखवलेले ब्रह्मांडच !

           तब्बेत बरी नसतानाही जावळीच्या दऱ्याखोऱ्यात गुरुजींचे न थकता चालणे, भर हिवाळ्यात ७℃ च्या कडाक्याच्या थंडीतही पहाटे साडेचार वाजता उठून हजारो धारकऱ्यांसहित #सूर्यनमस्कार, बैठका मारणारे गुरुजी पाहिले की जन्म धन्य होतो. विसावा – आराम विसरलेले. तहान-भुक विसरलेले ८४ वर्षांचे योगी, त्यागी, वैरागी जीवन जगणारे आदरणीय भिडे गुरुजी जवळून अनुभवले की अंगावर काटा उभा राहतो.

           शिवभक्तीने लोटपोट झालेली.. अंगात श्री शिवसूर्यजाळाची आग चेतलेली, गतजन्माला आठवणारी, या जन्मात आपल्या जीवनाचे सोने करून घेणारी, श्री #शिवाजी #संभाजी रक्तगटाची लाखो तरणीताट पोरं गुरुजींच्या एका हाकेने सह्याद्रीच्या कुशीत एकत्र येतात. गुरुजींनी ठरवून दिलेला दंडक आणि शिस्त पाळत या मोहिमेत सहभागी होतात हे सामान्य कार्य नाही…

            महाराष्ट्रासोबच दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, काश्मीर, उत्तराखंड येथून मोहिमेत सहभागी झालेले धारकरी गुरुजींच्या कार्याची, त्यांच्या श्री शिवशंभुवरील दृढ भक्तिची अनुभूती देतात. गुरुजी नेहमीच सांगतात की, शिवाजी संभाजी हाच बीजमंत्र हिंदुस्थानाला जगाचा बाप बनवू शकतो हेच सत्य आहे.

           #श्री_संभाजीराव_भिडे_गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहिम देव, देश आणि धर्माप्रति जागरूकता जागवणारी पवित्र गंगा आहे. जी सह्याद्रीच्या अंगाखाद्यावर उगम पावते.

         ज्या गंगेत सर्व #धारकरी #हिंदू म्हणूनच स्नान करतात. ती पवित्र गंगा प्राशन करतात. यात कोणीच कोणाला तुझी जात कोणती? हे विचारत नाही. पुरोगाम्यांच्या विषारी दंशाला बळी पडलेला हिंदू समाज खडबडून जागा व्हावा. त्याला त्याच्या कुळाची आठवण व्हावी. समस्त जातींनी भेदाभेद विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी.. जी पिढी अंतरबाह्य शत्रूचा नायनाट करेल. गुरुजींना असा महाराष्ट्र घडवायचाय जो भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल. देशाच्या सिमा ओलांडून घातक शत्रूच्या नरडीचा घोट घेईल. गुरुजींची ही इच्छा आई भवानी नक्कीच पूर्ण करील यात काहीच शंका नाही.

सुखाला त्वरें देऊनि सोडचिठ्ठी ।

धरूं मुंगीवत् राष्ट्रकार्यीं चिकाटी ।।

झिजू चंदनासारिखे रात्रदिन ।

जगूं हिंदुराष्ट्रास करण्या महान ।।

    ————————————-

        🖋गणेश पावले

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभाग

    ————————————-

Categories: गणेश पावले, माझी भटकंती, लेखन - गणेश पावले, विशेष लेख आणि अनुभव | Tags: , , , , , , | Leave a comment

धारकरी

🚩
धारकरी

🚩

~~~~~~~~~

तुमचे आमचे आहे जुने सोयरिक ।

आधीं बंधु, #धारकरी आणिक मावळे ॥

वाटेमधी पुसती शिवकाळ ऐकमेंका।

शिवाचा #मावळा होता कैसा ॥

चित्त, अंतरंग, घर प्रपंच विसरले।

रुधिरांच्या धारा गत जन्मास आठवले ।।

#गुरुराया संगे एकरूप व्हाया ।

माळरानात स्वर्गी अंतरलों ।।

#हिंदुत्वाचा_अंश आहे आम्हातही ।

म्हणुनी एक झाले मन ।।

मावळे शिवबाचे, पुन्हा #शिवकाळ जगले।

काट्याकुट्या, कडेकपारित, दगडावर विसावले।।

#धारकरी म्हणे गत जन्म- जन्माचे सार्थक ।।

मावळा शिवाचा होईन मी॥

📝

गणेश पावले, मुंबई

Categories: एकच राजे शिवछत्रपती माझे, छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना., माझी भटकंती, माझी शिवकाव्ये | Tags: , , , | 2 Comments

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ची “श्री दुर्गामाता दौड” दादर, मुंबई येथे प्रचंड उत्साहात साजरी.

        IMG-20151022-WA0025

        श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची “श्री दुर्गामाता दौड” म्हणजे शिवाजी संभाजी रक्तगटात राष्ट्रभक्ती,राष्ट्रनिष्ठा वाढवणारी क्रांतिकारी चळवळ याचा प्रत्यय काल दादर येथे झालेल्या दौडीत आला. महाराष्ट्राच्या पवित्र मातीत लाखो धर्म रक्षक ,राष्ट्र प्रेमी आणि देशभक्त जन्माला यावेत हे आई भवानी चरणी वरदान मागण्यासाठी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्री दुर्गामाता दौड महाराष्ट्रभर सुरु केली.
       संपूर्ण मुंबईमधून शेकडो शिवभक्त, शिवप्रेमी, धर्माभिमानी तरुण एकत्र आले. दिवस होता दसऱ्याचा, दिनांक २२ ऑक्टोबर २०१५ वेळ सकाळची ७.३० ची. डोक्यावर भगवा फेटा परिधान करून राष्ट्रप्रेमाने भारावलेले तरुण दौडीसाठी सज्ज झाले. मुंबई पोलिस दलाच्या महिला अधिकार्यांनी भगव्या ध्वजाचे पूजन केले. अन दौडीला प्रारंभ झाला. देशभक्तीपर राष्ट्रगीते म्हणत दौड सुरु झाली. “आई भवानी आईचा जयजयकार, भगव्या ध्वजाचा जयजयकार. उदो गं अंबे उदो” ची ललकार करत दौड निगाली ती थेट शिवतीर्थावर.
भक्ती शक्ती संगमात आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींना दिलेला शब शब्द मुंबईकरांनी पाळला. गुरुजींनीही मुंबईकरांकडे एक मागणे मागितले होते कि, मुंबईत यावर्षी १०० ठिकाणी श्री दुर्गामाता दौड निघाली पाहिजे आणि मुंबईकरांनी तो शब्द पाळला. आणि संपूर्ण मुंबईभर श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. ठीक ठिकाणी निघालेल्या या दौडीत भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजी, तानाजी, फिरंगोजी नरसाळे, मुरारबाजी, प्रतापराव गुज्जर, असामान्य त्याग करणारे शिवा काशीद यांच्यासारख्या तमाम वीरांचा जयघोष करत, प्रत्येक धारकरी अभिमानाने छाती फुलवत आजच्या हिंदू धर्माच्या वारसांच्या डोळ्यात अंजन घालत होता.
महिलांनीही या दौडीत विशेष सहभाग घेतला. हातात शस्त्र घेवुन महिला या दौडीत सहभागी झाल्या. नारी ही देशाच उज्वल भविष्य आहे. तीच रक्षण आपण आणि तिने स्वता केलं पाहिजे. तिचा दुर्गावतारच या राष्ट्राला तारील असा ठाम विश्वास आहे.

IMG-20151022-WA0021

कोणीही नारी जगती रुखमाई आहे,
हा भाव रक्ती आमच्या प्रती श्वास वाहे,
माता न व्यक्ती असते परमात्मा रूप,
देवअवतार जगती खलू मात्रू रुप।।१।।

      मुंबईत सर्वत्र पहाटेच्या ब्रम्ह मुहूर्तावर हातात भगवा झेंडा आणि शस्त्रे घेऊन तमाम धारकरी त्या आदीशक्ती श्री दुर्गामातेला हाक मारु लागले..की “आई दार उघड, आता दार उघड !” हे मागणे स्वतासाठी नाही, तर राष्ट्रासाठी आहे,धर्मासाठी आहे…! हे नवरात्र हे राष्ट्रीय नवरात्र म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान साजरे करते. आज बांग्लादेश, पाकिस्तान व् इस्लाम च्या रुपाने तो औरंग्या जीवंत आहे. पण पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज मात्र आज कुठेही जीवंत दिसत नाहीत… ते पुन्हा जन्म घ्यावेत आणि अधोगतीला जाणारा ही हिंदू समाज टिकवावा यासाठी आई भगवतीला भल्या पहाटे विनवणी करणारा हां उपक्रम म्हणजे “श्री दुर्गामाता दौड़” होय.
दादर कबुतरखाना येथून निघालेली दौड शिवमूर्ती, शिवतीर्थ दादर येथे समाप्त झाली. या दौडीला दादर विभागातील पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार. हे देव देश धर्माच कार्य असच अखंड चालू राहो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

लेखन – गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभाग

काही क्षणचित्रे –

IMG-20151022-WA0028 IMG-20151022-WA0027 IMG-20151022-WA0026 IMG-20151022-WA0024 IMG-20151022-WA0023 IMG-20151022-WA0022 IMG-20151022-WA0020 IMG-20151022-WA0016 IMG-20151022-WA0004 IMG-20151022-WA0031 IMG-20151022-WA0030

Categories: गणेश पावले, गुणगान राजांचे, छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना., लेखन - गणेश पावले, विशेष लेख आणि अनुभव | Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | 1 Comment

सुनो औरंग अब लौट चले हम, शेर संभा बडा का संहार करें

सुनो औरंग अब लौट चले हम शेर संभा बडा का संहार करें

सुनो औरंग अब लौट चले हम शेर संभा बडा का संहार करें

सुनो औरंग अब लौट चले हम शेर संभा बडा का संहार करें

Categories: गुणगान राजांचे, छ. संभाजी महाराज, माझी शिवकाव्ये | Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , | 3 Comments

भक्ती आणि शक्ती संगम – धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून.

☼”ज्ञानोबा – तुकोबा”च्या मंत्रात “शिवाजी – संभाजी” हे दोन महामंत्र गुंजले अन धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून☼

संत पाऊली गोजीरी ,गंगा आली आम्हावरी
जेथे उडावी रजधुळी ,तेथे करावी अंघोळी

अधिक आषाढ कृ० ९, शुक्रवार, शके १९३७ पुणे येथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होते. वारकरी-धारकरी संगम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम हा सोहळा
जेंव्हा परकीय आक्रमण आले होते, देश, धर्म, सांप्रदाय नष्ट होत चालले होते. या उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला, कोणीच वाली न्हवते तेंव्हा छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्माला आले आणि त्यांनी अपार पराक्राम गाजवून, परकीयांना धूळ चारून देव, देश आणि धर्माच्या पाठीशी उभे राहून सर्वांचे रक्षण केले, साधुसंताना अभय दिले, ज्यांच्यामुळे पंढरीचा पाडुरंग, तुळजापूरची आई भवानी माता परकीय जाचातून वाचली, मुक्त झाली याच शिवरायांचा नामघोष. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रूपाने दिंडीत सहभागी झाला होता.

म्हणे बाप माझा वसे पंढरीत,
आई राहते नित्य तुळजापुरात,
तया दर्शनासाठी आसुसलेला,
मराठा म्हणावे अशा वाघराला

भक्ती आणि शक्ती – वारकरी धारकरी संगम म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची भेटच जणू. भक्ती आणि शक्तीची भेट काल पुणेकरांनी डोळे भरून पाहिली.
नामदेव, एकनाथ, सावता माळी, ज्ञानेश्वर भावभक्तीची गंगा घरोघरी पोहोचवली. नामदेवांनी महाराष्ट्र धर्माचा झेंडा अखंड भारतात रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची ज्योत महाराष्ट्रातच चेतवली आणि दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राचे श्रेष्ठत्व मान्य करायला लावले.
संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ शिवशंभू या पितापुत्रांच्याच काळात रोवली गेली. वारकरी आणि धारकरी म्हणजेच भक्तीशक्ती संगम सोहळा पुणे येथे पार पडला.
हर हर महादेव गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हे गजर रंगून गेले, अभंग, कीर्तने आणि विठूमानाचा जयघोष झाला.
“याची देही याची डोळा । धारकरी वारकरी संगम सोहळा” पुणेकरांनी मनात साठवला.

माझा भाव तुझे चरणी । तुझे रूप माझे नयनी ॥
सापडलो एकामेकां । जन्मोजन्मी नोहे सुटका ॥
त्वा मोडिली माझी माया । मी तो जडलो तुझिया पाया ॥
त्वा मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयी ॥
नामा म्हणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविले कोणा ॥

“जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल” नामघोषात “हर हर महादेव” अशी ललकार
डोक्यावर भगवा फेटा, मुखात शिवनामाचा, विठ्ठल रखुमाई नामघोष, छाती अभिमानाने फुगलेली आणि सोबत आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींची शिस्त आणि स्वतः गुरुजी.
असा हा वारकरी आणि धारकरी असा संगम याची देही याची डोळा पहायला रस्त्यावर अमाप गर्दी लोटली
विठ्ठल नामाची दिंडी चालली, धारकरी वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम.

वारकरी सांप्रदाय म्हणजे पंढरपूर. तुकोबा, ज्ञानोबांची वारी, आणि धारकरी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवाजी संभाजी रक्तगटाची ललकारी”

“भारत माता कि जय” आणि “जय जय विठ्ठल रखुमाई ।। जय जय विठ्ठल रखुमाई” हे दोन नामघोष पहिल्यांदाच एकमेकांत मिसळले होते.

हे विठ्ठला पांडूरंगा,
या देश आणि धर्मावरील संकटाला दूर कर, आम्हाला काही नको पण या हिंदुराष्ट्राच रक्षण कर, तूच माऊली तूच साऊली सकळांची, या झोपलेल्या देशाला महाराष्ट्राच्या तरुणाला पुन्हा जाग कर, हातात शिवनामाच शस्त्र आणि हृदयात शिवरायांच्या अभिमान जागव, देव, देश आणि धर्मासाठी जगायला आणि मरायला शिकव, अखंड हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आन हेच मागणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरयांनी विठ्ठला, ज्ञानोबा, तुकोबाचरणी मागितले.

© लेखन – गणेश पावले
वारीतील काही क्षण

20150710_153536 20150710_170630 20150710_153512 20150710_153528 20150710_170044 20150710_170507 20150710_173618 20150710_173929 20150710_173946 20150710_174030 20150710_174123 20150710_174331 20150710_174546 20150710_174606 20150710_174729 20150710_174738 20150710_174912 20150710_174929 20150710_175619 20150710_180134 20150710_180244 20150710_181950 20150710_184057 20150710_190610 20150710_190709 20150710_192942 20150710_194838

Categories: विशेष लेख आणि अनुभव | Tags: , , , , , , , , , , , , , , , | Leave a comment

ज्ञानोबा – तुकोबा च्या मंत्रात गुंजणार शिवाजी – संभाजी हे दोन महामंत्र – भक्ती शक्ती संगम सोहळा २०१५

“!! ज्ञानोबा माऊली तुकाराम !!”
“!! ज्ञानोबा माऊली तुकाराम !!”
!! जय भवानी, जय शिवाजी !!
!! जय भवानी, जय शिवाजी !!
!! हर हर महादेव, हर हर महादेव !!

ज्ञानोबा – तुकोबा च्या मंत्रात गुंजणार शिवाजी – संभाजी हे दोन महामंत्र.

   संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ शिवशंभू या पितापुत्रांच्याच काळात रोवली गेली.

वारकरी आणि धारकरी म्हणजेच भक्तीशक्ती संगम सोहळा १० जुलै रोजी पुणे येथे पार पडणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी या सोहळ्याची आतुरतेने वात पाहत आसतात. एक दिवस वारी सोबत चालण्याचे भाग्य या दिवशी लाभते. हर हर महादेव गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हे गजर रंगून जातात आणि संपन्न होतो तो भक्ती शक्ती संगम सोहळा

तर चला पाहू

“याची देही याची डोळा । धारकरी वारकरी संगम सोहळा” म्हणजेच भक्ती शक्ती संगम

शुक्रवार दिनांक १० जुलै २०१५ , दुपारी २ वाजता श्री शिवप्रतिष्ठानच्या सर्व धारकरी परिवाराने जंगली महाराज मंदिर पुणे येथे एकत्रित यावे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई

☼ संपर्क –
मंगेशराव केणी – ९१६७३३४२९५
गणेशराव पावले – ९६१९९४३६३७
विनायकराव बालगुडे- ९९२०४२४९९८

!! राष्ट्रांत निर्मु अवघ्या श्री शिवसुर्यजाळ !!
भक्ती शक्ती संगम सोहळा

भक्ती शक्ती संगम सोहळा

Categories: एकच राजे शिवछत्रपती माझे, विशेष लेख आणि अनुभव | Tags: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | 1 Comment

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा – श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे….

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,  ३४२ वा ” श्रीशिवराज्याभिषेक सोहळा ” श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड”

मी संपूर्ण परिवारासोबत “ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,  ३४२ वा ” श्रीशिवराज्याभिषेक सोहळा “( रविवार ३१/०५/२०१५) श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड” वर जाण्याचे ठरवले,
सकाळी ४ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो आणि ध्येय्यमंत्र, प्रेरणामंत्र खड्या आवाजात म्हणून, पहिल्या पायरीच दर्शन घेतलं, अंगात वेगळाच आवेश आला आणि आम्ही गड चढायला सुरवात केली, रात्रीच्या अंधारात उजेडासाठी  टॉर्च होता त्याच्या प्रकाशात आम्ही गड चढायला सुरवात केली. आश्चर्य म्हणजे वाटेत कुठेही न थांबता, थोडासाही विसावा न घेता आम्ही महादरवाजा गाठला, माझा २ वर्षाचा चिमुकला त्याला खांद्यावर घेवून रायगड चढलो, वरती जात पर्यंत १ ते १/५ तास लागला होता आता सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास  उत्सुक होता. आम्ही राजदरबारात पोहचे पर्यंत पालखी निघाली होती.

      हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराजा, माहाराजा, अखंड हिंदुस्थानाचा अधिपती, पहिला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ३४२ वा राज्यभिषेक सोहळा काल (रविवारी) मोठ्या थाटात रायगडावर पार पडला.  ढोल-ताशांचा गजर आणि हर-हर महादेवच्या घोषणांनी रायगड दणाणून निघाला होता.

      मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ दिवसभर हाच आवेश हाच जोश प्रत्येक शिवभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. प्रचंड आनंद कल्लोळ आज रायगड वर दिसत होता, भगव्या पताका झळकत होत्या, शांत आणि थंड हवेत मन मोहरून निघत होत.

राजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात सदरेतून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली तेंव्हाचा जल्लोष याच जन्मी याची डोळा आनुभवन्याचा योग मला आणि माझ्या चिमुरड्याला मिळाला. तो हि या सोहळ्याचा आनंद घेत होता.

 होळीच्या माळावर ढोलताशांच्या गजरात, हर हर महादेव गर्जनेचा संगम झाला, तलवारी उंचावल्या भगव्या पताका झळकल्या. आणि रायगड पुन्हा एकदा धन्य झाला.

हा सारा आवेश पाहून अजून २ वर्षे ही पूर्ण न झालेला माझा चिमुरडा रुद्र हातात भगवा घेवून सामील झाला होता.

भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।
**********************************

लेखन / छायाचित्रण

– गणेश पावले

*************************

काही क्षण या देदिप्यमान सोहळ्याचे-

******************************************


लेखन / छायाचित्रण
– गणेश पावले

Categories: माझी भटकंती | Tags: , , , , , , , , , | Leave a comment

Blog at WordPress.com.